वन नेशन, वन इलेक्शन आणि EVM दोन्ही फ्रॉड! संजय राऊत यांचा घणाघात

नाशिक येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी वन नेशन वन इलेक्शन आणि ईव्हीएमवर भाष्य केले. वन नेशन वन इलेक्शन आणि ईव्हीएम हे दोन्ही फ्रॉड असून फक्त भाजपला कायमस्वरुपी सत्तेवर राहण्यासाठी फेकलेले जाळे आहे. ज्या दिवशी ईव्हीएम जाईल त्या दिवशी भाजप ग्रामपंचायतसुद्धा जिंकणार नाही. भाजपला स्वत:च्या क्षमतेवर एवढा आत्मविश्वास असेल तर त्यांनी कोणत्याही एका निवडणुकीपुरते ईव्हीएम दूर करावे. वाराणसी किंवा सूरतच्या निवडणुका ईव्हीएमशिवाय घेऊन दाखवाव्या, मग त्यांनी कळेल, असे राऊत म्हणाले. ईव्हीएम ही लोकशाहीतील दुर्घटना आहे. लोकांचा या प्रक्रियेवर विश्वास नाही. ईव्हीएमने अर्धी लोकशाही संपवली आहे, त्यात वन नेशन वन इलेक्शनची भर पडली तरी देशातील लोकशाही पूर्णपणे संपल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत म्हणाले.

ईव्हीएमविरोधात विरोधक आवाज का उठवत नाही? असा सवाल केला असता राऊत म्हणाले की, खुप प्रयत्न झालेले असून प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेलेले आहे. पण या देशातील घटनात्मक संस्थास स्वायत्त आणि स्वतंत्र असायला पाहिजे या अपेक्षेने बनवल्या गेल्या, पण त्या तशा राहिलेल्या नाहीत हे दुर्दैव आहे. जगभरातील देशांनी ईव्हीएम प्रक्रिया रद्द केलेली आहे, मात्र ती भारतात चालू आहे. या प्रक्रियेविरोधात भाजपनेच आवाज उठवला होता आणि ईव्हीएम रद्द करा म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले होते. आज तोच भाजप ईव्हीएमचा कवटाळून बसला आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

तसेच ईव्हीएम हॅक होऊ शकते हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. देशात भ्रष्टाचार, हुकुमशाही आहे हे सिद्ध करूनही न्यायालय गप्प आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार चाललेले आहे, दहाव्या स्केड्यूलचे उल्लंघन करून पक्षांतर झालेले आहे हे पुरावे देऊनही न्यायालयाने काही केलेले नाही. न्यायालयाला कसले पुरावे पाहिजे? विधानसभा अध्यक्षांपुढे सर्व पुरावे असतानाही ते पुरावे मिळाले नाही म्हणतात. अशा प्रकारे घटनात्मक संस्थेचे काम चालू असेल तर पुराव्याला विचारते कोण, असा परखड सवालही राऊत यांनी केला.

हे कोत्या आणि संकोचित मनोवृत्तीचे लक्षण, संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा

दरम्यान, माध्यमांनी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीतील सहभागाविषयी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊनच आम्ही हुकुमशाही, भारतीय जनता पक्ष आणि मोदींचा पराभव करणार आहोत. तसेच जागावाटपाचा तिढाही येत्या दोन-तीन दिवसांमध्ये संपलेला असेल. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीशीही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)