मोदींना अदानींची पेन्शन – संजय राऊत

‘पंतप्रधान मोदींची पेन्शन अदानीकडून येते; पण आम्हाला त्यांची नाही, तर सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता आहे. तुमचे ‘अच्छे दिन’ नको, आमची जुनी पेन्शन द्या,’ असे प्रतिपादन यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केले.  ‘ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे असतात, ती लढाई आपण जिंकतो. सुभाष देसाई यांनी सर्वांच्या पेन्शनचा हिशेब काढला. मलाही किती पेन्शन मिळणार, हेही त्यांनी आता मला सांगून टाकले आहे. पण आमच्या पेन्शनपेक्षा आम्हाला समोर हा जो तमाम मराठी माणूस बसलेला आहे, त्याच्या पेन्शनची चिंता सगळ्यात जास्त आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले.