अर्धवट उपमुख्यमंत्र्यांनी आधी स्वत:ची खुर्ची सांभाळावी, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला

राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. फडणवीस यांनी राम मंदिर लढ्याचा इतिहास समजून घ्यावा. ज्या पद्धतीने त्यांचा अपमान करून त्यांना अर्धवट उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे त्यावर त्यांनी लक्ष द्यावे. त्यांनी आधी स्वत:ची खुर्ची वाचवावी, असा टोला राऊत यांनी लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

राम मंदिर हा विषय महाराष्ट्रात शिवसेनेला लक्ष्य करण्याचा वाटात असेल तर फडणवीस यांनी गेल्या 30-35 वर्षातील राम मंदिर लढ्याचा इतिहास समजून घ्यावा. त्यांनी आधी स्वत:ची खुर्ची सांभाळावी. ज्या पद्धतीने त्यांना अपमानित करून अर्धवत उपमुख्यमंत्री केलेले आहे त्यावर त्यांनी लक्ष द्यावे. राज्यात एक फुल, दोन डाऊटफूल सरकरा सुरू आहे. जे एक फुल आहेत ते सुद्धा राहणार नाहीत. दोन डाऊटफुल उपमुख्यंमंत्री असून फडणवीस पूर्ण उपमुख्यमंत्रीही नाहीत. त्यातही वाटेकरी आहेत. त्यांनी त्यावर बोलाले, असा टोला राऊत यांनी लगावला.

ठाकरे कुटुंबाची सुरक्षा ही केंद्र सरकारची जबाबदारी, संजय राऊत यांनी सुनावलं

राम मंदिरासंदर्भात शिवसेनेचे योगदान काय आहे हे या जगातील प्रत्येक हिंदू जाणतो. तेव्हा फडणवीस गोधडीत रांगत होते. राम मंदिरावर शिवसेनेला काय प्रश्न विचारता? त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही कुठे होता? हे डरपोक पळून गेले होते. अयोध्येचे मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी शिवसेनेच्या राम मंदिरावर प्रश्न विचारावा ही संघ निती आहे. स्वत:ची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावर बोट दाखवायचं हा रामाचा अपमान असल्याचेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)