दादरमधील 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवत नोटीस बजावणाऱ्या सरकारला शिवसेनेच्या दणक्यानंतर जाग आली. शनिवारी सायंकाळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी हनुमान मंदिरात महाआरती घेणार असल्याचे जाहीर करताच रेल्वे प्रशासनाने घाईघाईने हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती दिली. यानंतर संजय राऊत यांनी ‘जय बजरंग बली, तोड दे गद्दारोंकी नली! ठाकरे है तो मुमकीन है!!’, असे ट्विट आपल्या एक्स अकाऊंटवरून केले आहे.
संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, दादर रेल्वे प्लॅटफॉर्म 12 जवळील 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिरावरील कारवाई रेल्वेने अखेर थांबवली. हमालांनी बांधलेल्या मंदिराला हात लावाल तर याद राखा, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. जय बजरंग बली, तोड दे गद्दारोंकी नली! ठाकरे है तो मुमकीन है!
दादर रेल्वे प्लॅटफॉर्म १२ जवळील ८० वर्ष जुन्या हनुमान मंदिरावरील कारवाई रेल्वे ने अखेर थांबवली!
हमालानी बांधलेले मंदिराला हात लावाल तर याद राखा.असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांनी दिला होता!
जय बजरंग बली
तोड दे गद्दारोंकी नली!
ठाकरे है तो मुमकीन है! pic.twitter.com/oQ3JwPaN7o— Sanjay Raut (@rautsanjay61) December 14, 2024