सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान मोदी; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवासस्थानी गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. गणपतीसमोर नतमस्तक झाले. नंतर त्यांनी आरतीही केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुडता, धोतर, उपरणं आणि गांधी टोपी असा खास मराठमोळा पेहराव केला होता. या भेटीवर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, धनंजय चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश आहे. नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत. पंतप्रधान किती जणांच्या गणेशोत्सवासाठी गेले याची माहिती नाही. पण काल ससरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आले, आरती केली आणि त्यांच्या दोघांतील संवाद पाहण्यात आला. धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रात एक छान चित्र आम्हाला पहायला मिळाले.

खरे म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटनातज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. आमच्याही मनात प्रश्न आला की पंतप्रधानांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्हाला योग्य न्याय देतील का? आम्ही जी लढाई करतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडताहेत अशा आमच्या मनात शंका आहे, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

ते पुढे म्हणाले की, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती त्या पदावर असताना तीन वर्ष महाराष्ट्रात एक बेकायदेशीर सरकार बसवले जाते. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जाते. हे सरकार घटनाबाह्य आहे असे सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले, तरी निर्णय आणि निकाल होत नाही. आता ते निवृत्तीला आले.

राजकारण कुटुंबापर्यंत नेण्याची सुरुवात फडणवीसांनी केली, आता त्यांना यातना कळतील – संजय राऊत

काल पंतप्रधान त्यांच्या घरी पोहोचले. त्याच्यामुळे याच्यामागे वेगळे काही घडतंय का? हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना, राष्ट्रवादीसारखे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? या लोकांच्या मनातील शंका काल घट्ट, पक्क्या झाल्या, असेही राऊत म्हणाले.