मोदी, शहांकडे डिग्री नाही पण देशाच्या सर्वोच्च पदांवरची नोकरी आहे, संजय राऊत यांची सडकून टीका

नागपूरमध्ये आज शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विदर्भातील विकास आणि रोजगारावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. मोदी, शहांकडे डिग्री नाही पण देशाच्या सर्वोच्च पदांवरची नोकरी आहे, असे वक्तव्य करत संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

डिग्री न मिळवता रोजगार देणारा एकच व्यवसाय आहे तो म्हणजे राजकारण. आमचे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडे डिग्री आहे आणि नाही दोन्ही. आमच्या पंतप्रधानांची डिग्री ही खरी की खोटी आहे, यावर संसदेतही चर्चा झाली. पंतप्रधानांकडे डिग्री नाही पण देशातील सर्वोच्च नोकरी मिळाली आहे पंतप्रधानपदाची. आमच्या गृहमंत्र्यांकडे कोणतीही डिग्री नाही पण त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाची नोकरी मिळाली आहे गृहमंत्रीपदाची, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदी, शहांवर सडकून टीका केली आहे.