एकनाथ शिंदे यांची प्रकृती नाजूक आहे, पाच तारखेला शपथविधीसाठी त्यांना एअरअॅम्ब्युलन्समध्ये आणावं लागेल अशा चिंतेत काही लोक आहेत असे विधान वसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मिंधेंना डॉक्टरांची गरज आहे की तांत्रिकांची? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आहेत, त्यांच्याबाबतीत असं वेडंवाकड बोलू नका. त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. त्यांना मंत्री भेटायला गेले पण त्यांचीही भेट झाली नाही. अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही डिस्टर्ब करू नका. पाच तारखेला शिंदे शपथवधीली येतील ना की त्यांना एअर अॅम्ब्युलन्समधून आणावं लागेल? अशा चिंतेत काही लोक आहेत. शिंदे यांना पहायला डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रात वाचलं. त्यांना डॉक्टरांनी गरज आहे की मांत्रिकाची गरज आहे ? हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदी पाठवत आहेत? त्यांच्या अंगात जी भुतं संचारली आहेत ती आता उतरवायला पाहिजे. आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे असे संजय राऊत म्हणाले.
कुठलं मंत्रिपद मिळणार हे एकनाथ शिंदे नाही ठरवू शकत. हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी ठरवणार. यांच्यासमोर कुठली हाडकी टाकायची आणि चघळायचं हे शिंदे नाही ठरवणार. आधी रुसवे फुगवे आणि नंतर शरणागती या पलीकडे शिंदेंच्या हातात काही नाही. तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतला होता तो याच स्वाभिमानाच्या रक्षणासाठी घेतला होता. कारण आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही तुमच्या दारामध्ये शेपूट हलवत उभे राहणार नाही. आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत असेही संजय राऊत म्हणाले.