मिंधे आणि सरकारचं रक्त मराठी आहे का? संजय राऊत यांचा घणाघात

Pc - Abhilash Pawar

मिंधे आणि सरकारचं रक्त मराठी आहे का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच ज्यांनी शिवरायांचा अपमान केला त्यांना गुडघे टेकावे लागले असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलिस, मिंधे सरकार, त्यांच्या पक्षातले पेशव्यांचे घाशीराम कोतवाल हे लोकभावना दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शिवरायांचा अपमान या महाराष्ट्रात झाला तेव्हा पंतप्रधान असो वा कोणीही असो त्यांना गुडघे टेकावे लागले असे संजय राऊत म्हणाले.

तसेच मोरारजी देसाई हे गुजरातचेच एक मुख्यमंत्री होते त्या काळात, त्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, त्यांनाही नरेंद्र मोदींप्रमाणे माफी मागायला लागली होती, हे मिंध्यांनी विसरू नये. मला आश्चर्य वाटतंय मिंधे आणि त्यांच्या सरकारचं रक्त तपावासं लागेल ते खरंच मराठी आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा घोर अपमान होऊनसुद्धा ते लोकभावनेचा उद्रेक दडपशाहीने खतम करु इच्छितात, त्यांचं रक्त मराठ्यांचं नसून त्यात वेगळं रसायन भरलंय का हे शोधण्याची आज गरज आहे असेही संजय राऊत म्हणाले.