सांगली पोलीस दलात जिल्ह्यांतर्गत बदल्या, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे आदेश

जिल्हा पोलीस दलातील निरीक्षक, सहायक निरीक्षक तसेच उपनिरीक्षकांच्या जिह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पुन्हा सांगलीत आलेल्या सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांची स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पुन्हा वर्णी लागली आहे. अधीक्षक संदीप घुगे यांनी या बदल्यांचे आदेश दिले आहेत.

अधीक्षक घुगे यांनी विनंतीनुसार आणि प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. विनंती बदल्यांमध्ये निरीक्षक विनय बहीर यांची कडेगाव ते आटपाडी, सहायक निरीक्षक प्रदीप शिंदे यांची आर्थिक गुन्हे शाखा ते दहशतवाद विरोधी पथक, सहायक निरीक्षक बिरप्पा लातुरे यांची गांधी चौक ठाणे ते जत, उपनिरीक्षक संदीप गुरव गांधी चौक ते ईश्वरपूर, उपनिरीक्षक रेखा जाधव विश्रामबाग ते शिराळा अशा बदल्या झाल्या आहेत.

सहायक निरीक्षक संदीप शिंदे वाचक शाखा ते एलसीबी बदली करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांची एलसीबीतून उमदीत आणि उमदीतून थेट कुपवाडला बदली झाली होती. कुपवाडची बदली रद्द करून वाचक 2कडे बदली झाली होती. पुन्हा त्यांची एलसीबीला वर्णी लागली आहे.

परजिह्यातून सांगली जिह्यात बदलून आलेल्या निरीक्षक संग्राम शेवाळे यांची कडेगावला बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय बदल्यांमध्ये सहायक निरीक्षक चेतन माने यांची ईश्वरपूर ते विश्रामबाग, सहायक निरीक्षक महेश श्रीपती गायकवाड यांची आष्टा ते तासगाव, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांमध्ये राजश्री दुधाळे यांची पलूस ते आष्टा, महेश बाळासाहेब गायकवाड यांची जत ते पलूस, मीनाक्षी माळी यांची जिल्हा विशेष शाखा ते अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष, लक्ष्मण खरात यांची उमदी ते शिराळा, रवींद्र भापकर यांची मिरज ग्रामीण ते गांधी चौक ठाण्यात बदली करण्यात आली. राजश्री गायकवाड (जत), गौतम सोनकांबळे (मिरज शहर), सुनील माने (तासगाव) यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.