सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला कर्नाटकातून अटक, 5 कोटींची केली होती मागणी

बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला सातत्याने धमक्या येत आहेत. सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता सलमानला धमकी देणाऱ्या राजस्थानच्या एका व्यक्तीला कर्नाटकातून पकडून महाराष्ट्र पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला 4 नोव्हेंबर रोजी रात्री व्हॉट्सअॅपद्वारे सलमान खानच्या नावे धमकीचा संदेश आला असून त्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यात म्हटले होते की, मी लॉरेन्सचा भाऊ बोलत आहे, सलमानला जर जिवंत राहायचे असेल तर त्याला आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल, पाच कोटी रुपये द्यावे लागतील, तसे न केल्यास सलमानला जिवंत सोडणार नाही. आमची टोळी आजही सक्रिय आहे, असेही संदेशात धमकवण्यात आले आहे. या आरोपीला कर्नाटकातून अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या एका वक्तव्यात आरोपी बीकाराम जलाराम बिश्नोई जो लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ असल्याचा दावा करतो. तो राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील मुळ रहिवासी आहे.

हावेरी पोलीस अधीक्षक अंशु कुमार यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एटीएस मिळालेल्या सूचनेनुसार हावेरी कसब्यामध्ये एका व्यक्तीला पकडण्यात आले असून आज त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. तपासा दरम्यान कळले की, आरोपी कर्नाटकचा रहिवासी आहे. ज्यानंतर त्याला पकडण्यासाठी वरळी पोलिसांचे एक पथक पाठविण्यात आले आहे. बिष्णोई याला मंगळवारी अटक करण्यात आले आणि त्याची चौकशी केल्यानंतर त्याला वरळी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.