सैनिक बँक अपहारप्रकरणी सदाशिव फरांडेचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

सैनिक बँक कर्जत शाखेतील 1 कोटी 79 लाख रुपयांच्या चेक अपहार प्रकरणातील सदाशिव फरांडे व राम नेटके याचा अटकपूर्व जामीन श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे सदाशिव फरांडे व राम नेटके यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना कधीही अटक होवू शकते.

1 कोटी 79 लाख रुपयांच्या चेक घोटाळ्या प्रकरणी सदाशिव फरांडे, राम नेटके, दिपक पवार यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात जिल्हा लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर दिपक पवार अटक आहे. त्याला अटक होऊ नये, म्हणून संजय कोरडे यांनी चेअरमन केबीनमध्ये कुलुप लावून लपून ठेवले होते.पोलीसांनी खाक्या दाखवताच कोरडे यांनी केबिनची चावी दिली होती. त्यानंतर पवार याला अटक झाली. यामधील आरोपी सदाशिव फरांडे, राम नेटके फरार आहेत.

फरार सदाशिव फरांडे व राम नेटके यांनी श्रीगोंदा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होऊन शनिवारी (दि.30 डिसेंबर) न्यायालयाने सदाशिव फरांडे व राम नेटके यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. सदाशिव फरांडे याच्यावर संजय गांधी निराधार योजनेतील अपहार प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत.

एसपी साहेब आर्थिक गुन्हेगारांना त्वरीत जेरबंद करून चाप लावा!
1 कोटी 79 लाखाचा अपहार प्रकरणी सदाशिव फरांडे याला पाठीशी घातल्याचा ठपका जिल्हा लेखापरीक्षक यांनी आपल्या अहवालात ठेवला आहे. असे असताना पोलीस व्यवहारे, कोरडे व संचालकांवर का मेहरबान आहे? याची चौकशी करुन, एसपी साहेब तुम्ही यात लक्ष घालून फरार आरोपीसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या सैनिक बँक संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून घ्यावेत तरच आर्थिक घोटाळे करणाऱ्यांना चाप बसणार असल्याची भावना बाळासाहेब नरसाळे व विनायक गोस्वामी यांनी व्यक्त केली आहे.