100 कोटींचे खंडणी वसुली प्रकरण, वाझेला जामीन, मात्र तुरुंगातून सुटका नाही

100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मंगळवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असल्याचे कारण देत वाझेने हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. न्यायालयाने गैरव्यवहाराच्या आरोपामध्ये जामीन दिला असला तरी मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटके प्रकरणात त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने मार्च 2021मध्ये व्यापारी मनसुख हिरेन हत्या व ऑण्टिलिया स्फोटके प्रकरणात अटक केली होती.

केंद्र सरकारचा आक्षेप नाही!

वाझेला जामिनावर सोडण्यास आपला काहीही आक्षेप नसल्याचे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले. ज्येष्ठ वकील राजा ठाकरे यांनी केंद्राची ही बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादाचा स्वीकार करीत न्यायालयाने वाझेला जामीन मंजूर केला.