सामना आणि मार्मिक दिवाळी अंकांचे दिमाखात प्रकाशन

दिवाळी म्हटली की लाडू, करंजीचा फराळ येतोच. पण दिवाळी अंकाच्या रूपाने साहित्यिक फराळही घरोघरी फस्त केला जातो. दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत दैनिक ‘सामना’ आणि साप्ताहिक ‘मार्मिक’चे दिवाळी अंक वेगळेपण जपणारे असतात. कला, संस्कृती आणि वैचारिक साहित्याने परिर्प्णू ठरलेल्या या दोन्ही अंकांनी वाचकांच्या हृदयात स्थान मिळवलेले आहे. याच परंपरेतून यंदाचा दिवाळी अंक मनोरंजनासह भरपूर वैचारिक खाद्य देणारा, वाचकांची अभिरुची समृद्ध करणारा असा आहे. दैनिक ‘सामना’ आणि साप्ताहिक ‘मार्मिक’च्या दिवाळी अंकांचे शानदार प्रकाशन बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख आणि दैनिक ‘सामना’चे संपादक उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’ निवासस्थानी पार पडले.

दिवाळी अंकांच्या प्रकाशनावेळी दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, मुख्य वितरक बाजीराव दांगट, प्रबोधन प्रकाशन प्रा. लि. चे संचालक विवेक कदम, नॅशनल हेड (मार्पेट डेव्हलपमेंट) दीपक शिंदे, ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, चारुदत्त दांगट, जाहिरात व्यवस्थापक सुचित ठाकूर, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते नितीन बानगुडे-पाटील, रवींद्र म्हात्रे, बी. के. राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

मनोरंजनासह भरपूर वैचारिक खाद्य…

या वर्षीच्या ‘सामना’ दिवाळी अंकात अनेक मान्यवरांचे लेख आहेत. युगानुयुगे स्त्राrवर होणाऱया अत्याचाराचा खेळ अव्याहत चालू आहे. फक्त खेळातली पात्र बदलताहेत आणि त्यांच्या जागाही बदलताहेत. याचा लेखाजोखा मांडतानाच उद्याच्या प्रकाश किरणांचा वेध घेणारा नीरजा यांचा भेदक लेख अंकात वाचता येईल. याच अनुषंगाने मल्याळम सिनेसृष्टीतील ‘मी टू ’चउद्रेक अन् हेमा कमिटीच्या अहवालावर प्रकाश टाकणारा सुजय शास्त्र्ााr यांचा लेख आहे. महिलांच्या कायदेशीर सुरक्षेवर अॅड. प्रशांत माळी यांचे लेखन महिलांना आणि एपंदर समाजाला मार्गदर्शन करणारे आहे. त्याला जोडूनच वाढत्या वयातील मुलांचे थ्रीलिंग भावविश्व प्रसाद मणेरीकर यांनी उलगडले आहे. डॉ. मुपुंद कुळे यांनी पुतळय़ांच्या राजकारणाचा फार्स मांडताना पुतळय़ांपेक्षा त्या महापुरुषांचे विचार महत्त्वाचे आहे त असे म्हटले आहे. ‘मासेस’चे लेखक असलेल्या सलीम-जावेद जोडीचा सुवर्ण कालखंड ऋता बावडेकर यांनी जिवंत केला आहे. राजेंद्र महाजन यांनी अजिंठामधले अभिजात लावण्य उलगडले आहे. टेलरिंगचे काम ते साहित्य अकादमीचा प्रवास… या प्रवासातील ‘उसवण’ देविदास सौदागर यांच्या शब्दांतून जाणून घेता येईल. याव्यतिरिक्त ‘हास्यजत्रा’फेम पृथ्वीक प्रतापच्या लेखणीतून उतरलेले धम्माल किस्से आहेतच. खेळाच्या मैदानातील महाराष्ट्राचा स्कोअर बोर्ड यावर अश्विन बापट यांनी लिहिले आहे. एआयच्या विवेकवादी वापरावर महेश कोळी यांचा माहितीपूर्ण लेख आहे. याव्यतिरिक्त विश्वास वसेकर यांचा आठवणींचा ‘अमलताश’ आणि नीती मेहेंदळे यांनी ‘निमित्तमात्र चहाचं’ हे अनुभवपर लेख वाचकांना सुखावून जातील.

– सेलिब्रेटी कुटुंबात जन्म घेतल्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. अवास्तव अपेक्षांचे ओझे आणि दोन पिढय़ांमध्ये कलाकार असणारे आई, वडील, मावशी यांच्याशी केली जाणारी तुलना, याविषयी नव्या पिढीचे कलाकार अभिनय बेर्डे, तनिषा मुखर्जी, हर्षवर्धन कपूर यांनी मोकळेपणाने मांडलेले मत अंकात वाचायला मिळेल. सोबत दासू वैद्य, सायमन मार्टिन, देविदास सौदागर, स्पृहा जोशी, प्रतिभा सराफ आदी दिग्गजांच्या कविता आहेत. विविध विषयांनी नटलेला दै. ‘सामना’चा दिवाळी अंक वाचकांसाठी अतिशय वाचनीय असा आहे.