बीड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी दोन व्हिडिओ शेअर केले आहेत.
भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिंमत बबनभाऊ गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकत्यांनी दाखवली, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
भाजपकडून #बीड_लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची हि दडपशाही रोखण्याची हिम्मत बबनभाऊ गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकत्यांनी दाखवली.
निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष… pic.twitter.com/O3cDBaE3jc
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 18, 2024
निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणारे आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे ? असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.