गाणी ऐकत दुचाकी चालवणे म्हणजे रॅश ड्रायव्हिंग

हेडफोनवर मोठय़ाने गाणी ऐकत दुचाकी चालवणे म्हणजे रॅश ड्रायव्हिंग करणे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने महिलेचा पाठलाग करण्याच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले. आरोपीने दुचाकी चालवत असताना गॉगल लावला होता. तो हेडफोनवर गाणी ऐकत होता. मात्र त्याने महिलेशी बोलण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. गाणी ऐकताना मान हलवली याचा अर्थ त्याने महिलेचा पाठलाग केला असा होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

आरोपीने शिक्षेचे 36 दिवस पूर्ण केले आहेत. त्याला तीन मुले आहेत. घरात तो एकटाच कमवणारा आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता त्याने भोगलेला शिक्षेचा कालावधी पुरेसा आहे. असे नमूद करत न्यायालयाने शुक्लाची सुटका करण्याचे आदेश दिले.