कोल्हापुरात रिक्षा, टॅक्सी चालकांचा बंद

प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिदिन 50 रुपये पासिंग दंड आकारणी केली जात असल्याच्या विरोधात कोल्हापुरातील 16 हजारहून अधिक रिक्षा, टॅक्सी आणि ट्रव्हलर चालकांनी मध्यरात्रीपासून बंद पुकारला. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

दरम्यान, दुपारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात या अन्यायकारक शासन आदेशाची होळी करण्यात आली. सोमवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकत्र आलेल्या रिक्षाचालकांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत निदर्शने करून रिक्षा बंद केल्या. त्यामुळे रात्री बारानंतर स्टॉपवरील रिक्षांची गर्दी कमी झाली. रिक्षा बंदमुळे शालेय विद्यार्थ्यांचेही हाल झाले, तर प्रवाशांनाही यांचा मोठा फटका बसला. दरम्यान, पासिंग दंड रद्द होईपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांना कोल्हापूर बंद करण्याचा इशारा रिक्षाचालक संघटनेचे समन्वयक ऍड. प्रवीण इंदुलकर यांनी दिला.