नगर जिह्यातील 42 विद्यार्थ्यांची ‘इस्त्रो’वारी

केरळ (थंबा) येथील ‘डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ येथील शैक्षणिक सहलीसाठी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, जिह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन असे 42 बालवैज्ञानिक ‘इस्रो’ सहलीसाठी पात्र ठरले आहेत.

जिल्हा परिषदेचे सीईओ आशीष येरकेर यांच्या पुढाकारातून चार वर्षांनंतर ‘इस्रो’ सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी 210 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड चाचणी परीक्षा घेतली. या परीक्षेच्या निकालातून पाचवी ते आठवीच्या 42 विद्यार्थ्यांना ‘इस्रो’ सहलीची संधी मिळाली आहे.

शिवतेज उगले (अकोले), अलोक कवळे (जामखेड), अमिता थोरात (कोपरगाव), संस्कृती शेलार (कर्जत), आर्यन गडवे (नगर), स्वराज सुंबे (पारनेर), वेदान्त गायकवाड (पाथर्डी), अलनोव्हा शेख (राहुरी), आरोही वाणी (राहाता), मंथन कराड (शेवगाव), ईश्वर सोनवणे (संगमनेर), आदिराज वाकडे (श्रीगोंदा), आविष्कार भगत (श्रीरामपूर), समर्थ ढेरे (नेवासा), गौरी वाकचौरे (अकोले), तनुजा सांगळे (जामखेड), अनन्या बागल (कोपरगाव), आदित्य दरेकर (कर्जत), अंजली परभणे (नगर), धनश्री भडके (पारनेर), आराध्या घुले (पाथर्डी), अंजली शेजुळ (राहुरी), साक्षी राशिनकर (राहाता), प्रांजल खेडकर (शेवगाव), सत्यजित देशमुख (संगमनेर), कार्तिक दरेकर (श्रीगोंदा), शंतनू कणसे (श्रीरामपूर), राजवर्धन आठरे (नेवासा), सुमित वैद्य (अकोले), यश भोंडवे (नेवासा), गीता जोरवर (कोपरगाव), अनुष्का दळवी (कर्जत), भक्ती परभणे (नगर), साई पुजारी (पारनेर), साक्षी निमसे (पाथर्डी), अरमान शेख (राहुरी), आर्या सांगळे (राहाता), कल्याणी गारपगारे (शेवगाव), स्नेहल मोरे (संगमनेर), श्रेया बोंबले (श्रीगोंदा), फातेमा सय्यद (श्रीरामपूर), आदित्य लोणारे (नेवासा).