रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला एका ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील कार्यालयावर बॉम्ब हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. या ईमेलमध्ये रशियन भाषेत संदेश लिहिण्यात आला होता. हा ईमेल नवे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आला होता. ही धमकी प्राप्त झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानची न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला.
दरम्यान, या आधी दिल्लीतील काही शाळांना शुक्रवारी धमकीचा ईमेल आहे. ईमेलमधून शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही या आठवड्यातील दुसरी घटना आहे. पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, एका आठवड्यात दुसरी घटना