रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बोठे याची पुन्हा जामिनासाठी खंडपीठात धाव

रेखा जरे हत्याकांड मध्ये मुख्य आरोपी बाळ बोठे याने पुन्हा संभाजीनगर खंडपीठामध्ये जामिन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. नगर येथील रेखा जरे हत्याकांड प्रकरणांमध्ये सध्या येथील नगर न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे. येथील न्यायालयाने नियमित सुनावणी सुरू करण्यासाठी आदेश दिलेले आहे. त्यानुसार साक्षीदारांच्या साक्ष झाल्या असून त्यांचे जबाब सुद्धा नोंदविण्यात आलेले आहे.

जरे हत्याकांडामध्ये मुख्य आरोपी बाळ बोठे हा असून त्याने हे कृत केले आहे त्याच्यावर मुख्य म्हणून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व तपासी अधिकारी पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केलेला आहे.

या प्रकरणांमध्ये 11 आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्या सर्वांचा खटला येथील न्यायालयामध्ये सुरू आहे असे असताना मुख्य आरोपी बोठे यांने या अगोदर सुद्धा संभाजीनगर खंडपीठांमध्ये जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता त्यावेळेला सुद्धा या अर्जावर सुधारणी होऊन संभाजीनगर खंडपीठाने त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला होता.

वास्तविक पाहता मागील महिन्यामध्ये दोन वेळेला तारखा या खटल्याच्या झाल्या असताना यामध्ये बोठे हा हजर झालेला होता पुन्हा त्याने संभाजीनगर खंडपीठांमध्ये जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केलेला आहे आता सरकारी पक्षाच्या वतीने म्हणणे मांडले जाणार आहे व त्याच्या अर्जावर आक्षेप सुद्धा घेतला जाणार आहे. एक प्रकारे हा आरोपी वेळ काढून पणा करत असल्याचेही दिसून येत आहे