जागतिक कसोटी क्रमवारीत अश्विनच अव्वल

हिंदुस्थानचा विक्रमी फिरकीवीर रवीचंद्रन अश्विनने गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. तो 870 गुणांसह पहिल्या स्थानावर असून जसप्रीत बुमरा आणि जोश हेझलवूड हे दोघेही 847 गुणांसह दुसऱया स्थानावर आहेत. तसेच अॅण्डरसन, शाहिन आफ्रिदी आणि कायल जेमिसन हे अव्वल दहा गोलंदाजांमध्ये कायम आहेत. चटगांव कसोटीच्या निकालानंतरही अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत काहीही बदल झालेला नाही. या क्रमवारीत रवींद्र जाडेजा 444 गुणांसह अक्वल स्थानी विराजमान आहे तर अश्विनने 322 गुण मिळवून दुसऱया क्रमांकावर आहे. या यादीत जाडेजाला मागे टाकणे अन्य खेळाडूंसमोर मोठे आव्हान असेल. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने 310 गुणांसह तिसरे स्थान काबीज केले आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱया कसोटीत दोन्ही डावांत 4 विकेट आणि 51 धावांची खेळी साकारत तिसरे स्थान कायम राखले आहे.