…असे हे शेजारी शेजारी; बनावट चावी बनवून शेजाऱ्याच्या घरावर मारला डल्ला

मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता रत्नागिरी शहरामध्ये चोरीची घटना घडली असून चोरट्याने 82 हजारांचा एवज लपांस केला आहे.
रत्नागिरी शहरातील हयातनगर भागात वास्तव्याला असणाऱ्या सफुरा डांगे यांच्या घरामध्ये चोरी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या महिलेने सफुरा डांगे यांचे कुलूप घेऊन जात त्याची बनावट चावी बनवली होती. संधीच्या शोधात असणाऱ्या महिलेने घरामध्ये सफुरा डांगे या नसताना डल्ला मारत 82 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यामध्ये तीस हजार रुपयांची सोन्याची बांगडी, 16 हजार रुपयांचे कानातील जोड, 15 हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 9 हजार रुपये रोकड यांचा समावेश आहे. बनावट चावीने घराचे कुलूप उघडून चोरी करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी दिली.