रेशनकार्ड-आधारकार्ड लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

सरकारने रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. ही दोन्ही सरकारी कागदपत्रे लिंक करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत होती, मात्र आता ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या कुटुंबांनी ही दोन्ही कागदपत्रे लिंक केली नसतील त्यांच्यासाठी ही अंतिम मुदत आहे.

रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी वेबसाईटवर तपशील भरल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी कन्फर्म झाल्यावर तुमचे रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक होईल. अंतोदय अन्न योजनेचा लाभ घेत असलेल्यांनी रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करणे आवश्यक आहे. ही दोन्ही कागदपत्रे लिंक केल्यामुळे एकापेक्षा जास्त रेशनकार्ड घेता येणार नाही.

घरबसल्या लिंक करा…

food.Q.gov.in या वेबसाइटवरून घरबसल्या रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करता येईल.
लॉगिन केल्यानंतर आधार क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक द्यावा लागेल.