Ratan Tata last rites – अंत्यदर्शनासाठी राजकारणी, उद्योजक, कलाकार, क्रीडापटूंसह सामन्यांची गर्दी

ज्येष्ठ उद्योजक, टाटा समन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री दोनच्या सुमारास त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले आणि सकाळी 10 वाजल्यापासून एनसीपीएलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अंत्यदर्शनासाठी राजकारणी, उद्योजक, कलाकार, क्रीडापटूंसह सामन्यांनी गर्दी केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या कार्यकारी निर्देशक ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद पिरामल हे रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले.

रिझर्व्ह बँक इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एनलीपीएवर रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.