बलात्कार प्रकरणातील दोषी व हरयाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहिम सिंग याला गेल्या दोन महिन्यात दोनदा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. याआधी त्याला नोव्हेंबर महिन्यात 21 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. या वर्षीचा हा पहिला पॅऱोल असून गेल्या वर्षी बाबा राम रहिम याला तीन वेळा पॅरोल मंजूर झाला होता.
आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी रहीम सध्या हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती. याआधी आजारी आई आणि स्वतः आजारी असल्याची कारणे देत रहीम अनेक वेळा बाबा राम रहिम हा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला आहे.