संबंधांच्या संमतीमुळे वकिलाविरोधातील बलात्काराचा गुन्हा रद्द

वकिलाविरोधातील बलात्काराचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. पीडितेची शारीरिक संबंधांसाठी संमती होती, असे न्यायालयाने नमूद केले.

न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला. याप्रकरणात आर्थिक फसवणुकीचेही आरोप आहेत. अशा प्रकरणात शिक्षेचे प्रमाण कमीच असते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

वकिलाचा दावा

पीडितीने संमतीने शरीर संबंध ठेवले. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती झाली नाही. अनेक महिने ती माझ्या सोबत राहत होती. त्यावेळी तिने कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. पीडितेचे आरोप आधारहिन आहेत, असा दावा वकिलाने केला.

काय आहे प्रकरण

पीडिता व वकिलाची शाळेपासूनची मैत्री होती. पीडिता लग्न करून परदेशात गेली. पतीसोबत तिचे वाद झाले. मुलाला घेऊन ती परत भारतात आली. घटस्फोटासाठी तिने वकिलाची मदत घेतली. वकिलाने गैरफायदा घेत माझ्या इच्छेविरोधात वारंवार शरीर संबंध ठेवले, असा आरोप पीडितेने केला. पोलिसांत याचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी वकिलाने याचिका केली होती. ही याचिका न्यायालयाने मंजूर केली.