‘केसाने गळा कापू नका, अन्यथा…’, मिंधे गटाचा भाजपला इशारा, जागावाटपावरून ठिणगी

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील पक्षांमध्ये जागावाटपावरून फटाके फूटत आहेत. जागावाटपाचे रोज नवनवीन आकडे समोर येत असून भारतीय जनता पक्ष मिंधे गट आणि अजित पवार गटाला कमी जागांमध्ये गुंडाळण्याच्या तयारीत आहे. यावरून दोन्ही गटांमध्ये चलबिचल सुरू असून मिंधे गटाचे नेते रामदार कदम यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे.

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून भाजप-मिंधे गटात संघर्ष सुरू असतानाच अन्य जागांवरूनही वादाची ठिणगी पडली आहे. मिंधे आणि अजित पवार गटात गेलेल्या खासदारांच्या जागांवरही भाजपचा डोळा आहे. यामुळे रामदास कदम यांनी संताप व्यक्त केला असून महाराष्ट्रात भाजपा जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद असल्याचे विधान त्यांनी केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे कान उपटले पाहिजेत. जे लोकं तुमच्यावर विश्वास ठेऊन आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. असे केल्यास लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल. लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये याचे भान भाजपच्या काही लोकांना आवश्यक आहे, असे रामदास कदम म्हणाले.

बाहेर काहीही बोला, मी सांगतो तेवढ्याच जागा मिळणार! मिंधे आणि दादा गटाला शहांनी ‘लायकी’ दाखवली

2009मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती असताना भाजपने मला पाडले हे वास्तव आहे. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघातही रविंद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. स्थानिक आमदाराला बाजुला ठेऊन त्यांच्याच मतदारसंघात विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन सुरू आहे. हे सर्व हेतूपुरस्पर सुरू असून असेच चालत राहिले तर भविष्यात भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही, असेही रामदास कदम म्हणाले. तसेच मागील निवडणुकीत काय झालं याची मला माहिती नाही. परंतु, पुन्हा एकदा आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदस कदम आहे हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)