राजापूर विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
राजापूर विधानसभा निवडणूकीच्या निकालावर संशय निर्माण झाल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आक्षेप नोंदवला आहे. मतदान केंद्र क्र.2 चापवली व मतदान केंद्र क्र.200 तुळसवडे येथील ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करावी अशी मागणी राजन साळवी यांनी केली आहे.