आम्ही मोदींचा कॉन्फिडन्स तोडला, पूर्वीचे मोदी आता राहिलेले नाहीत; राहुल गांधी यांचा प्रचारसभेत हल्ला

आजचे नरेंद्र मोदी पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. त्यांचा आत्मविश्वास आम्ही तोडला आहे, मानसिकदृष्टय़ा ते पार खचले आहेत. आता ते केवळ विरोधक जे म्हणतात त्यावर प्रतिक्रिया देत असतात, असा जोरदार हल्ला सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पूंछ जिह्यातील प्रचारसभेत चढवला.

खरंच, 56 इंच छातीची बढाई मारणारे पूर्वीचे मोदी आता राहिलेले नाहीत. त्यांचा पूर्वीचा जोमही त्यांनी गमावला आहे. आता फक्त ते विरोधी पक्षांनी केलेल्या मागण्यांवर प्रतिक्रिया देत असतात, असे म्हणत राहुल यांनी मोदी आणि भाजपने आत्मविश्वास गमावला असल्याचा दावा त्यांनी सुरनकोटच्या सभेत केला.

संघावर टीकास्त्र

– भाजपच्या नेतृत्वाखालील पेंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी भाजप आणि आरएसएसवर देशभरात द्वेष आणि हिंसाचाराची संस्कृती फैलावल्याचा आरोप केला. ‘ते देशभरातील लोकांमध्ये फूट पाडतात. त्यांचे राजकारण वैमनस्यातून पह्फावते, असा आरोप राहुल यांनी केला.

– जम्मू-कश्मीरच्या 90 सदस्यीय विधानसभेसाठी दुसऱया टप्प्यात 25 सप्टेंबर रोजी सहा जिह्यांतील 26 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. तिसऱया टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबर रोजी झाल्यावर 8 ऑक्टोबरला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे.

काय म्हणाले राहुल गांधी

पंतप्रधानांच्या एकूणच वर्तनात बदल झाला आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काहीही मागणी केली तरी ती पूर्ण होते. जेव्हा ते एखादा कायदा लादण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही ठामपणे त्याच्या विरोधात उभे ठाकतो तेव्हा ते माघार घेतात आणि दुसरे विधेयक पुढे आणतात. त्यांचा आत्मविश्वास लयाला गेला आहे. आम्ही नरेंद्र मोदींची सायकॉलॉजिकल पकडच बिघडवली आहे, अशा शब्दांत राहुल गांधी मोदी यांच्यावर तुटून पडले होते.

राज्याचा दर्जा पुन्हा देण्याचे आश्वासन

जम्मू आणि कश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देणे ही आमची प्रमुख मागणी आहे. निवडणुकीनंतर पेंद्राने जर राज्याचा दर्जा दिला नाही तर आम्ही पेंद्रावर दबाव आणू. काँग्रेसला जम्मू आणि कश्मीर दिल्लीतून चालवण्याऐवजी स्थानिक लोकांद्वारे चालवायचे आहे, असे ते म्हणाले.