मल्याळम सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्रींनी लैंगिक छळाच्या तक्रारीने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये अनेक दिग्गज दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांचाही चेहरा समोर आला आहे. आता अभिनेत्री खूशबू आणि राधिकाने त्यांच्यासोबत झालेला लैंगिक छळाबाबत आवाज उठवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मल्याळम इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.
एका प्रसिद्ध अभिनेत्रीने एका दिग्गज अभिनेत्यावर फसवणूकीचा आरोप केला होता. कारमध्ये तिच्यावर लैंगिक छळ केल्याचा दावा केला होता. ही घटना 2017 साली घडली होती. त्यावेळी खळबळ उडाली होती. त्यानंतर सिनेमांमध्ये अभिनेत्रीच्या लैंगिक छळ प्रकरणाचा तपासासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश हेमा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. या समितीने अभिनेत्रींना सांगितले होते की, त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक छळाबाबत पुढे येऊन मोकळेपणाने बोलू शकतात आणि त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला.
मागच्या आठवड्यात हा रिपोर्ट जारी झाल्यानंतर, काही ज्येष्ठ अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाबाबत बोलायला सुरुवात केली आहे, शिवाय त्यांनी याचा सामना कसा केला हेही त्या सांगत आहेत. अभिनेत्री खूशबू यांनी सांगितले होते की, एक निर्माता तिच्या खोलीत वाईट हेतून शिरला होता त्यावेळी तिने तिचे शूज समोर ठेवले आणि याने मार खाणार की, सर्व यूनिटसमोर मार खाणार? असा दमच भरला होता. त्यानंतर अभिनेत्री राधिका यांनीही खुलासा केला. व्हॅनिटी व्हॅनमध्येही अभिनेत्रींच्या परवानगीशिवाय कॅमेरे लावले जातात. राधिका म्हणाल्या, त्यांना आणि त्यांच्या बहिणीला एका प्रसिद्ध अभिनेत्याने सिनेमात किसिंग सीन करण्यासाठी भाग पाडले होते. पुढे त्या म्हणाल्या, साधारण कमल हासनच्या सिनेमांमध्ये किसींग सीन असणे साधारण गोष्ट होती. दिग्दर्शक निर्मात तरुणांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या दृश्यांचा समावेश करायचे. त्यामुळे कमल हासन यांच्या सिनेमात किसींग सीन असणे हे नियमच बनला होता. काही अभिनेत्री अशाप्रकारच्या दृश्यांना सहन करायच्या, मात्र काही अभिनेत्री किसींग सीनमुळे कमल हासन यांच्या सिनेमात काम करायला संकोच करायच्या.
किसींग सीनसाठी माझ्या संकोचामुळे मी ‘सिप्पीकुल मुथु’ सिनेमानंतर कमल हासनसोबत काम करणे बंद केले. लिप-लॉक किसिंग सीन करण्यासाठी मलाच नाही तर माझ्या बहिणीलाही त्रास दिला गेला. मी याला विरोध केल्यावर काही लोक माझ्यावर नाराज झाले. यामुळे मी अनेक संधी गमावल्या, असं ती म्हणाली.