पीएनबी बँकेचा ग्राहकांना झटका; कर्ज महागले

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कोटय़वधी ग्राहकांना जोरदार झटका दिला. बँकेने 1 ऑगस्टपासून आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवीन वाढीव दर 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट्स (एमसीएलआर) च्या दरात 0.05 टक्के वाढ केली आहे. या वाढीमुळे एमसीएलआरचा दर 8.90 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे बँकेकडून होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन घेणाऱया कर्जदारांचा ईएमआय आता वाढणार आहे. पीएनबी बँकेच्या आधी एसबीआय आणि बँक ऑफ बडोदा या बँकेनेही आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाने एमसीएलआरमध्ये 0.05 बेसिस पॉइंट म्हणजेच 0.05 टक्के वाढ केली आहे. ही दरवाढ 9 जुलै 2024 पासून लागू झाली आहे. एमसीएलआरच्या वाढीमुळे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन महाग झाले आहेत.