
आपल्या 77 वर्षीय आईला पाच हजार रुपये भरणपोषण देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱया मुलाला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला तसेच या याचिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. याचिका करणाऱया व्यक्तीला न्यायमूर्ती जसगुरप्रीत सिंह पुरी यांनी 50 हजार रुपये दंड ठोठावला. तीन महिन्यांच्या आत आईच्या नावे प्रिन्सिपल जज, फॅमिली कोर्ट, संगरूर येथे ही रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले.