
स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही, तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत? असा संतप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला विचारला आहे. पुण्यात एसटी स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणावरून संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच आज पुण्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले आहेत की, स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल कृती झाली नाही. ही घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 लोक होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कोणालाही शंका आली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला.” यावरूनच वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
X वर एक पोस्ट करत विजय वडेट्टीवार यांनी या याप्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, ”स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप का? स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही, तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत?”
वडेट्टीवार म्हणाले की, स्वारगेटमध्ये बलात्कार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीने विरोध केला नाही. म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहे. विधान करताना मंत्र्यांनी थोडी लाज शरम बाळगली पाहिजे. आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोष देऊन सिद्ध काय करायचं आहे? आरोपीला क्लिनचीट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का आहे? राज्यातील महिलाना लाडक्या बहिण म्हणून मिरवणाऱ्या युती सरकारची नियत इतकी खालच्या स्तरावरची असताना महिलाना सुरक्षित कसे वाटेल? आरोपी हा सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असल्याचे माहिती होताच महायुती मंत्रिमंडळाकडून आता बलात्कारी आरोपीची बाजू घेऊन त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पुणे- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय ? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप का ?
स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही, तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत?
स्वारगेट मध्ये बलात्कार झाला आणि… pic.twitter.com/1fopFRkTru
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 27, 2025