
पुण्यात दत्तात्रय गाडे या तरुणाने एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आणि फरार झाला आहे. या प्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गाडेची पुण्यात एक गर्लफ्रेंड होती आणि गाडे तिच्याकडे तिच्या मैत्रिणींचे मोबाईल नंबर मागायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गाडे फरार झाल्यानंतर पोलिसांनी गाडेबद्दल तपास सुरू केला. गाडेची पुण्यात एक प्रेयसी आहे. ती पुण्याच्या भोर तालुक्या राहते. पोलिसांची तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की तो नेहमी माझ्या मैत्रिणींचे मोबाईल नंबर मागायचा आणि त्यांना फोन करून त्यांना त्रास द्यायचा असेही तिने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी आता तपास सुरु केला आहे. या बलात्काराप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.