विठ्ठल रुक्मिणीच्या मौल्यवान दागिण्यांच्या मुल्यांकनाला सुरुवात, विमा देखील उतरवला जाणार

भाविक, वारकर्‍यांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यात असलेले मौल्यावान व दुर्मिळ दागिने आहेत. या दागिन्यांच्या मूल्यमापनास सुरुवात करण्यात आली आहे. याकरीता अनुभवी तज्ञ मूल्यमापनकार विष्णू सखाराम काळे यांच्याकडून दागिन्याचे मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. हे सर्व दागिने इसवी सन 500 ते 1892 या कालावधीतील आहेत. हे दागिणे मौल्यवान असून जगात इतरत्र कोठेही उपलब्ध नसल्याचे मूल्यांकनकार काळे यांनी सांगीतले आहे.

मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, समितीचे सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मान्यतेने व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली दागिणे गाठवण्याचे व मुल्यांकनाचे काम सुरु करण्यात आले आहे. श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या खजिण्यामध्ये सोन्या चांदीने दागिने, मोत्याचे हिरे, माणके, मोती अशी रत्नजडित अनमोल अशी आभूषणे आहेत. पूर्वीचे राजे महाराजे, संस्थान अशा मोठ मोठ्या व्यक्तींनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस विविध अलंकार भेट म्हणुन 350-400 वर्ष पुर्वी दिलेले आहेत. 1985 साली स्थापन झालेल्या मंदिरे समितीने आजपर्यंत ते सर्व दागिने दरवर्षी नवरात्र महोत्सव पूर्वी गाठवून घेवुन काळजीपूर्वक जतन केले आहेत. आजही ते काम काळजीपूर्वक व व्यवस्थित केलें जात आहे.

13 व्या शतकापासून 15 व्या शतकापर्यंतचे 325 अतिशय पुरातन, मौल्यवान दागिने विठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यात आहेत. यातील काही दागिने हे शिंदे-होळकर यांच्यासारख्या राजघराण्यातून अर्पण केलेले आहेत. मंदिर समितीचे सराफ खजिना विभाग आणि व्यवस्थापकांच्या उपस्थितीत हे मूल्यमापनाचे काम सुरू आहे. लवकरच या अनमोल दागिन्याचे मोल निश्चित करण्याचे काम ककरण्यात येणार आहे.

हे करणार मूल्यमापण

मूल्यमापनकार विष्णू सखाराम काळे यांच्यासमवेत संजय नारायण कोकीळ (नित्य उपचार विभाग प्रमूख), पांडूरंग ज्ञानेश्वर बुरांडे (देणगी व छपाई विभाग प्रमूख), ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी (जमीन व सोने चांदी विभाग प्रमूख), दादा तुकाराम नलवडे (आस्थापना सह विभाग प्रमूख), गणेश घनश्याम भणगे (समिती सराफ), दत्तात्रय प्रल्हाद सुपेकर (समिती सराफ).

हे गाठवतात दागिणे

नवरात्र महोत्सव पूर्वी सर्व दागिणे पाहणी करून गाठविने काम काज हे मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या मार्गदर्शन खाली ताजुद्दीन पटवेकरी, समीर पटवेकरी हे कारागीर करत आहेत.

मूल्यमापनानंतर दागिन्यांचा विमा

श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दागिन्यांचे प्रथमच मूल्यांकन होत आहे. हा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. या पुरातन दागिण्यांचे व्यवस्थित जतन करून ठेवण्यात येत असले तरी यापूर्वी त्याचे मूल्यांकन झालेले नाही. आता या दागिन्यांच्या मूल्यांकनाला सुरुवात झाली आहे. हे मूल्यांकन पूर्ण होण्यास पुढील दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अनपेक्षित घटना घडू नये. म्हणून या दागिन्यांचा विमा उतरवला जाणार आहे.
-मनोज श्रोत्री, व्यवस्थापक