Pune News – दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिष्णोईचे फोटो स्टेटसला ठेवले, पुण्यात तिघांना अटक

पुण्यात दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटो स्टेटसला ठेवल्याने लोणी काळभोर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी.एस. गायगोले यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली.

याप्रकरणी लोणी काळभोर येथील एका व्यावसायिकाने तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात कलम 196 (1)(अ)(ब) नुसार दाखल करण्यात आला आहे.

तिन्ही आरोपींचा दाऊद गँगशी काही संबंध आहे का? तसेच स्टेटस ठेवण्यास कुणी प्रवृत्त केले का? गुन्ह्यात कुणाकुणाचा सहभाग आहे? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.