Pune News : ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

शिरूर तालुक्यासह इतर भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. पुणे एलसीबी व शिरूर पोलिसांनी संयुक्तरित्या तपास करत चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीला पकडल्यानंतर 48 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच या चोरट्यांकडून तब्बल 14 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाती शिरूर, दौंड उपविभागात मागील महिन्यात ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्याअनुषंगाने विविध भागांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. ट्रान्सफॉर्मर चोरल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत होते. तसेच परिसर अंधारमय होत असल्यामुळे इतर चोरीच्या घटना वाढण्याची भिती नागरिकांमध्ये होती. सदर घटनेचे गांभिऱ्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्ह्यांची वेळ, गुन्ह्यांची कार्यपद्धती यांचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिग गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करण्यात आली होती.

पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचानांप्रमाणे तपासाला सुरुवात करण्यात आली. सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असल्याची गोपनीय माहिती बातमीदाराकडून आरोपींना मिळाली. तसेच ट्रान्सफॉर्मची चोरी करणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके रवाना करण्यात आली आणि साफळा रचून आरोपी विशाल खंडू पवार (वय 25), प्रदीप राजेंद्र शिंदे (वय 26), ओमकार अजित घोडेकर, आदेश सयाजी भुजबळ (वय 19), हर्षल राजेंद्र शिंदे (वय 24), श्रीकांत शिवाजी जाधव (वय 22), करण नाना माळी (वय 19), सोनू विकास धुळे (वय 28) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींचा चौकशी केली असता त्यांनी गन्हा केल्याचे उघड झाले. तसेच चोरी केलेली माल हा आरोपी दिपक पांडुरंग सांगळे (वय 27) याला विकला असल्याचे सांगितले. त्यामुळे दिपक सांगळे याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना गुन्हा करण्यासाठी एक पिकअप आणि सहा दुचाकींचा वापर केल्याची कबुली दिली. सर्व वाहणे जप्त करण्यात आली आहेत. तसेच या गुन्ह्यात चोरी केलेल्या मालापैकी 500 किलो ग्रॅम वजनाच्या तांब्याच्या पट्ट्या व तारा हस्तगत करण्यात आल्या असून एकूण 14 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 48 गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यातील आरोपी विशाल पवार याच्यावर एकूण 11 दुचाकी चोरल्याचा गुन्हा दाखल आहे, तर आरोपी प्रदिप शिंदे यांच्यावर 3 गुन्हे दाखल असून ओतूर पोलीस स्टेशनकडील चोरीच्या गुन्ह्यांमध्ये फरार आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, एस.डी.पी.ओ. स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पो.नि.ज्योतीराम गुंजवडे, स्था.गु. शा.चे सपोनि राहूल गावडे, योगेश लंगुटे, पोसई अभिनीत साकंद, पोसई एकनाथ पाटील स्था.गु.शा कडील अंमलदार तुषार पंदारे, दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, सचिन घाटगे, अजित भुजबळ संजू जाधव, मंगेश नागरगोजे, स्वप्निल अहीवळे, विजय कांचन, संदीप वारे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सागर धुमाळ, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, हनुमंत पासलकर, दत्ता तांबे, रामदास बाबर, राहूल पवार, विनोद पवार, समाधान नाईकनवरे, तुषर भोईटे, मंगेश भगत, मपोना सुजाता कदम शिरूर पोलीस स्टेशनचे नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, शिक्रापूर पो स्टे कडील अंमलदार किशोर तेलंग, प्रशांत गायकवाड, प्रतिक जगताप, यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.