Pune News – रस्ता खचल्याने महापालिकेचा अख्खा ट्रक गेला खड्ड्यात!

पुण्यामधील समाधान चौक परिसरात असणाऱ्या सीटी पोस्ट भागात पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता खचून अख्खा ट्रक खड्ड्यात गेला. सुदैवाने चालकाने वेळीच ट्रकमधून बाहेर उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पुणे महापालिकेचा हा ट्रक असून सीटी पोस्टच्या आवारात सुरू असलेल्या काही कामानिमीत्त हा ट्रक सामान घेऊन आला होता. मात्र लक्ष्मी रस्त्यावरील समाधान चौक परिसरात असणाऱ्या सीटी पोस्ट भागात हा ट्रक आला असता पेव्हर ब्लॉक खचल्याने अख्खा ट्रकच खड्ड्यात गेला. सदर घटना कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचं पथक दाखल झाले आहे. सुदैवाने ट्रक चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच बाहेर उडी मारल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. मिळालेल्या माहितनुसार दोन दुचाकी सुद्धा खड्ड्यात पडल्या आहेत.