मी सगळ्यांना तुरुंगात टाकेन; पुणे पोलिसांना IAS पूजा खेडकरच्या आईची दमदाटी, व्हिडीओ व्हायरल

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची चर्चा होत असतानाच आता त्यांच्या आईने पुणे पोलिसांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पूजा खेडकरांनी त्यांच्या खासगी ऑडी गाडीवर सरकारी लाल दिवा (अंबर दिवा) लावल्याने त्या गाडीवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना पूजा यांची आई मनोरमा यांनी दमदाटी केली. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यावरही हल्ला केला. तसेच मी सगळ्यांनाच तुरुंगात टाकेन, अशी धमकीही पूजा खेडकरांच्या आईने पोलिसांना दमदाटी दिली.

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना गेटबाहेरच उभे केले. त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नाही. बंगल्याला आतमधून कुलूप असल्याने बाहेर ताटकळत असलेल्या पोलिसांनी मनोरमा यांनी दमदाटी केली. कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना तुरुंगात टाकण्याची धमकीही त्यांनी दिली. तसेच त्यांना गेटबाहेरच उभे केले. प्रशिक्षणार्थी आयएएस असताना स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावला होता. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. अशा प्रकारचा दिवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या गाडीवर लावण्यात येऊ नये अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या असतानाही पूजा खेडकरांनी गाडीवर दिवा लावला होता. तसेच प्रशिक्षणार्थी कार्यकाळ सुरू असताना त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे केबीन बळकावल्याची चर्चा होती.

प्रशिक्षणार्थी आयएएस असताना अवाजवी मागण्या करून वरिष्ठांना दमदाटी करणाऱ्या पूजा खेडकर यांचे पितळ आता उघड पडलं आहे. पूजा खेडकरांनी खोट्या अंपग दाखल्याच्या आधारे आयएएस पद मिळवल्याचे उघड झाले आहे. पूजा खेडकरांनी ट्रेनी कार्यकाळात जे वर्तन केलं त्याबाबतचा अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. त्याचसोबत मसुरी येथील प्रशिक्षण संस्थेने पूजा खेडकरांच्या वर्तनासंबंधी अहवाल महाराष्ट्र शासनाकडून मागवला आहे. त्यानंतर आता त्यांच्या आईने पुणे पोलिसांनाच दमदाटी केल्याची घटना उघड झाली आहे.