Puja Khedkar case – पूजा खेडकर यांना कोर्टाकडून दिलासा; 21 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण

बडतर्फ प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालायने पूजा खेडकर यांना 21 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. ‘लाईव्ह अँड लॉ’ने याबाबत वृत्त दिले आहे.

खोटी कागदपत्र दाखवत यूपीएससीची फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाईही झाली आहे. याच प्रकरणात अटक टाळण्यासाठी पटियाळा हाऊस न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर आज सुनावणी पार पडली.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने दिल्ली पोलीस आणि यूपीएससीलाही नोटीस बजावली. यासह पूजा खेडकर यांना 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे निर्देशही दिल्ली पोलिसांना दिले.

दरम्यान, दिल्ली पोलिसांना तपासात सहाकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने पूजा खेडकर यांना दिले. यावेळी न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. पूजा खेडकर यांच्या अटकेची गरज काय? या सर्व प्रकरणात इतर कोणीही सहभागी नसताना याची गरज का? असे सवाल न्यायालयाने पोलिसांना केले.

Pune crime news : पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल