राज्यातील 62 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. देशातील एक हजार 38 पोलिसांना पदके जाहीर झाली असून त्यात महाराष्ट्रातील 62 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त सत्यनारायण चौधरी, दीपक निकम, योगेश चव्हाण, संजय मोहिते यांच्यासह निकेत कौशिक, मधुकर पांडे, दिलीप सावंत, संजय पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव झाला आहे.

पोलीस सेवेत उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक कामगिरी करणाऱ्यांबरोबरच शौर्य गाजविणाऱ्या पोलिसांना केंद्रीय गृह विभागाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील 62 पोलिसांचा पदक विजेत्यांमध्ये समावेश असून त्यातील उल्लेखनीय सेवेसाठी चार अधिकाऱ्यांना, गुणवत्तापूर्वक सेवेसाठी 40 तर 18 पोलिसांना शौर्यपदक जाहीर झाले आहे.

गुणवत्तापूर्व सेवेसाठी पदक

पोलीस महानिरीक्षक सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, एसीपी दीपक निकम, राधिका फडके, उपअधीक्षक सुनील लाहीगुडे, उपविभागीय अधिकारी-  विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक प्रदीप वारंग, माणिक बेद्रे, योगेश चव्हाण, संजय मोहिते, सुरेश कदम, रणवीर बायस, वसंतराव बाबर, जयंत राऊत, किशोर सुर्वे, महेशकुमार ठाकूर, सुनील डोरजे, सचिन गवस, मिलिंद बुचके, दिलीप तडाखे, उपनिरीक्षक- सुशीलकुमार झोडगेकर, हरिश्चंद्र जगदाळे, सुहास मिसाळ, किशोर नलावडे, विनय देवरे, एसडीपीओ- राजेंद्र शिरतोडे, उपनिरीक्षक – उत्तम सोनावणे, प्रकाश परब, सदाशिव साटम, अशोक काकड तसेच प्रमोद आहेर, राजेंद्र घाडीगावकर, नंदू उगले, नितीन संधान, संदीप हिवलकर, सुनील डेटके, शाबासखान पठाण, सीमा डोंगरीटोट, विजय पाटील आणि देवराज कोवासे.

पोलीस शौर्यपदक

आयपीसीएस – सोमय मुंढे तसेच संकेत गोसावी, कमलेश नैतम, संकेत बचलवार, मुन्शी मडवी, सूरज चौधरी, मोहन उसेंडी, देवेंद्र अत्राम, संजय वाचमी, विनोद मढवी, गुरुदेव धुर्वे, दुर्गेश मेश्राम, हिराजी नेवारे, ज्योतीराम वेलादी, माधव मढवी, जीवन नरोटे, विजय वड्डेटवार, वैलास गेडाम.

उल्लेखनीय कामगिरीसाठी

अपर       पोलीस     महासंचालक-निकेत   कौशिक,    मधुकर     पांडये, विशेष पोलीस    महानिरीक्षक
दिलीप सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड.