प्रवीण तांबे नेतृत्व करणार 

गुजरातमधील आणद येथे होणाऱया पश्चिम विभागीय व्हेटरन आंतर राज्य टी-20 क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबईचा प्रवीण तांबे मुंबईच्या संघाचे नेतृत्व करेल. गुजरात राज्य व्हेटरन क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने आणद व्हेटरन क्रिकेट संघटना आयोजित ही स्पर्धा 8 ते 10 जानेवारीदरम्यान व्ही. व्ही. नगर येथील इलेक्शन मैदानावर खेळवली जाईल. या स्पर्धेत मुंबईसह महाराष्ट्र, गोवा आणि यजमान गुजरातचा संघ असेल. स्पर्धेत मुंबईचा पहिला सामना 8 जानेवारीला यजमान गुजरात संघाशी होईल. दुसऱया लढतीत मुंबईसमोर गोव्याचे आणि शेवटच्या लढतीत गुजरातचे आव्हान असेल.