प्रदीप मयेकर कॅरमसंघटनेवर पुन्हा बिनविरोध

आपल्या क्रीडाप्रेमामुळे अनेक जिल्हा आणि राज्य क्रीडा संघटनांवर कार्यरत असलेल्या प्रदीप मयेकर यांची मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सलग सहाव्यांदा मयेकर यांची बिनविरोध झाली. तसेच राष्ट्रीय कॅरमपटू आणि कॅरमच्या विकासासाठी झटणाऱया अरुण केदार यांचीही सरचिटणीस म्हणून बिनविरोध करण्यात आली आहे.

कॅरम संघटनेची नुकतीच त्रैवार्षिक निवडणूक पार पडली. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात सक्रिय जिल्हा संघटना असलेल्या मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचा पारदर्शक कार्यभार पाहाता या निवडणुकीला कुणाचाच विरोध नसल्यामुळे गेल्या कार्यकारिणीलाच पुन्हा एकदा बिनविरोध निवडून देण्याचे काम पदाधिकाऱयांनी केले. आता ही कार्यकारिणी ऑक्टोबर 2027 पर्यंत कॅरमची सूत्रे सांभाळतील.

बिनविरोध निवडून आलेली कॅरम संघटनेची कार्यकारिणी

अध्यक्ष – प्रदीप मयेकर, कार्याध्यक्ष – धनंजय पवार, उपाध्यक्ष – केतन चिखले, सरचिटणीस- अरुण केदार, सहचिटणीस- अमोल शिंदे, संदेश कांबळे, संजय बर्वे, खजिनदार- संजय देसाई, कार्यकारिणी सदस्य- अनुपमा केदार, दिलीप सांडगे, परविंदर सिंग, राजेश राणे, नितीन पारकर, सचिन घटकांबळे, संजय मोहिते, योगिता चिपळूणकर.