गाडी विकत घ्यायला गेला आणि लग्नच करून आला! लग्नानंतर जे झालं….

जुनी गाडी खरेदी करायला गेलेल्या पोलिसाने थेट गाडीच्या मालकिणीशीच लग्न केलं. पण, दोनच वर्षांत या लग्नामागचं सत्य समोर आल्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

ही घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथे घडली आहे. येथे राहणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाला सेकंड हँड गाडी विकत घ्यायची होती. त्याने 2019मध्ये ओएलएक्सवर एका गाडीची जाहिरात पाहिली आणि तो दिलेल्या पत्त्यावर गाडी पाहण्यासाठी गेला.

ती गाडी एका महिलेची होती. पोलीस तिला पाहताच तिच्या प्रेमात पडला. त्या महिलेनेही त्याला आपण उच्चजातीय आणि अविवाहित असल्याचं त्याला सांगितलं. त्याने गाडी खरेदी करायचं सोडून तिच्याशी लग्न करून टाकलं.

लग्नानंतर दोन वर्षं त्याला काहीच पत्ता लागला नाही. पण, एक दिवस त्याला संशय आला आणि त्याने शोध घेतला. त्यातून जे सत्य त्याला कळलं, त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

कारण, जिला तो बायको म्हणत होता तिचा त्याआधी एक विवाह झाला होता. ती घटस्फोटित होती आणि तिला एक आठ वर्षांचा मुलगाही होता. आपल्या घटस्फोटित नवऱ्याला भेटत असताना तिला या पोलिसाने पाहिलं होतं, त्यामुळे संशयापोटी त्याने शोध घेतला होता.

पोलिसाला सगळा प्रकार समजल्याचं कळताच महिलेने सामानासकट तिथून पळ काढला. याविरोधात पोलिसाने तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात असून महिलेला नोटीस बजावण्यात आली आहे.