फेंगल चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चेन्नई विमानतळावरही या वादळाचा फटका दिसून आला. विमानतळावर लॅंडिंग करत असतानाच वादळामुळे हवेच्या दबावामुळे विमानाचा अपघात होता होता वाचला. पायलटने तात्काळ सतर्कता दाखवत विमानाचे पुन्हा उड्डान केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
चेन्नई विमानतळावर शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. लँडिंगसाठी विमान धावपट्टीच्या जवळ आले. मात्र जोरदार हवेच्या दबावामुळे विमानाला धावपट्टीवर उतरण्यास अडचणी येऊ लागल्या. जोरदार वाऱ्यामुळे विमान अनियंत्रित झाले. मात्र पायलटने सतर्कता दाखवत तात्काळ विमानाचे पुन्हा उड्डान केले आणि थोडक्यात अपघात टळला.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे चेन्नई विमानतळावरील उड्डान संचालनावर परिणाम झाला. चेन्नई विमानतळावर शनिवारी 22 उड्डाने रद्द करण्यात आली तर तीन विमानांचा मार्ग बदलण्यात आला.