गॅस सिलिंडर रुळावर ठेवून घातपाताचा कट

रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर ठेवून कालिंदी एक्प्रेसला अपघात घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र एक्स्प्रेसने सिलिंडरला धडक देताच ते रेल्वे रुळाच्या बाजूला फेकले गेले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर कालिंदी एक्स्प्रेस जवळपास 20 मिनिटे थांबवण्यात आली होती. घटनास्थळावरून रेल्वे पोलिसांनी सिलिंडर जप्त केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी रेल्वे पोलिसांना पेट्रोलची बॉटल आणि माचीसही मिळाली आहे. कांलिंदी एक्स्प्रेसचा अपघात घडवून आणण्याचा कट होता की काय? अशी चर्चा सुरू आहे.