तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या! मोहन भागवत यांचं विधान, रोख कुणाकडे?

लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला जन्म बायोलॉजिकल नसून परमात्म्याने पृथ्वीवर पाठवल्याचे विधान केले होते. या विधानाचा त्यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला होता. आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या’, असे विधान केले आहे. त्यामुळे त्यांचा रोख नक्की कुणाकडे अशी चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले होते मोदी?

आई हयात होती तेव्हा मला वाटायचं बायोलॉजिकली माझा जन्म झाला आहे. पण आई गेल्यानंतर मी सगळे अनुभव एकत्र करून पाहिले तेव्हा कळून चुकले की मला परमात्म्यानेच पाठविले आहे. ही ऊर्जा बायोलॉजिकल शरीराने येऊ शकत नाही. ईश्वराला माझ्याकडून काहीतरी काम करून घ्यायचे आहे म्हणून ही ऊर्जा मला दिली आहे. देवाने मला प्रामाणिकपणा दिला, पुरुषार्थ करण्याचे सामर्थ्य दिले आणि प्रेरणाही तोच देत आहे. मी कुणीच नाही. केवळ एक इन्स्टमेंट आहे. म्हणूनच मी जे काही करतो ते देवच माझ्याकडून करून घेत आहे, असे मोदी म्हणाले होते.