केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने प्राप्तिकर विभागाच्या पॅन 2.0 प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. या प्रोजेक्टसाठी 1 हजार 435 कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर केला आहे. नव्या 2.0 प्रोजेक्टनुसार क्यूआर कोड असणारी पॅन कार्ड जारी केली जाणार आहेत. ज्यांच्याकडे जुने पॅन कार्ड असेल तेदेखील वैध राहणार आहे. पॅन कार्डधारकांना क्यूआर कोड असलेले नवे ई-पॅनकार्ड मोफत उपलब्ध करून दिले जाणार असले तरी याच्या प्रिंटसाठी मात्र 50 रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.