महिलांना गर्भवती करण्यासाठी भरघोस पैशांचे आमिष दाखवून सायबर फसवणूक

निपुत्रिक महिलांना गर्भवती करण्यासाठी भरघोस पैसे देण्याचे आमिष पुरुषांना दाखवणारे एक ऑनलाईन रॅकेट उघडकीस आणून पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. नवादा जिह्यातील चिटगुरमा गावातील या सायबर गुन्हेगारांनी ‘ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब’ असे नाव देत सोशल मीडियाद्वारे पुरुषांना प्रलोभन दाखवले होते. या आरोपींनी त्यांच्या जाळ्यात अडकलेल्यांकडून 750 रुपये नोंदणी शुल्क आकारले आणि त्यानंतर त्यांनी 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंत डिपॉझीटचीही मागणी केली होती. बाळाच्या जन्मासाठी 13 लाख आणि बाळ जन्मले नाही तरीही 8 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.