एअरपोर्टवर प्रवाशाचे ‘लगेज’ गायब; इंडिगो एअरलाइन्सला 70 हजारांचा दंड

indigo

इंडिगो एअरलाइन्सने एका प्रवाशाने जेद्दा ते हैदराबाद असा प्रवास केला. हैदराबाद विमानतळावर उतरल्यावर प्रवाशाने सामान गायब झाले. प्रवाशाने तक्रार केल्यानंतर 12 तासांत लगेज मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र सामान परत मिळायला 17 दिवस लागले. यानंतर प्रवाशाने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. हैदराबादच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने इंडिगो एअरलाइन्सच्या दोषी ठरवले आणि संबंधित प्रवाशाला 70 हजार रुपये देण्याचा आदेश दिला. यामध्ये 20 हजार रुपये नुकसान भरपाई आहे. सैय्यद जावेद अख्तर जैदी असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याने जून 2023 मध्ये जेद्दा ते हैदराबाद असा प्रवास केला होता. हैदराबाद विमानतळावर उतरल्यावर त्याने लगेज बेल्टवर बराच वेळ वाट पाहिली. मात्र त्याचे सामान आले नाही.

– इंडिगोने 12 तासांत सामान मिळेल, असे जैदी यांना सांगितले. मात्र तसे काहीच झाले नाही. सामान परत मिळायला पंधरा दिवसांहून अधिक अवधी लागला. बॅगेत कपडे व महत्त्वाची कागदपत्रे असल्याचा दावा जैदी यांनी केला. त्यामुळे व्यवसायात त्यांना नुकसान सोसावे लागले. तसेच कपडे आणि अन्य सामान खरेदी करण्यासाठी 80 हजार रुपये खर्च करावे लागल्याचे सांगितले.