ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वरळीत मिंधे गटाला मोठे खिंडार पडले आहे. वरळीतील मिंधे गटाच्या शेकडो पदाधिकाऱयांनी गुरुवारी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
महिला उपविभागप्रमुख रेणुका तांबे, वरळी विधानसभा समन्वयक विजया महाजन, शाखा क्र. 196चे शाखाप्रमुख श्रीकांत जावळे, शाखा क्र. 198चे शाखाप्रमुख संतोष शिंदे, शाखा क्र. 199चे शाखाप्रमुख ज्ञानदेव सणस, वरळी विधानसभा अध्यक्ष (अल्पसंख्याक विभाग) अन्वर खान दुराणी, शाखा क्र. 196चे युवा शाखा समन्वयक अथर्व राणे, प्रहार महासंघ महाराष्ट्र सचिव निखिल सावंत, शाखा क्र. 195च्या समन्वयक मोहिनी मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभाग क्र. 199च्या माजी वॉर्ड अध्यक्ष शीला सिंग, शाखा क्र. 195च्या उपशाखाप्रमुख रेश्मा धोत्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई तसेच शिवसेना आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईदेखील उपस्थित होते. मिंधे-भाजप सरकारकडून होणारी महाराष्ट्राची लूट आम्ही पाहू शकलो नाही त्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश केला, अशी भावना पदाधिकाऱयांनी व्यक्त केली.